आवडणाऱ्या क्षेत्रालाच प्राधान्य द्या - अतुल कहाते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘‘घरातील कुणी व्यक्ती एखाद्या अभ्यासक्रमाला आहे, म्हणून किंवा त्याला स्कोप आहे म्हणून तो अभ्यासक्रम निवडू नका. कारण प्रत्येक अभ्यासक्रमाला स्कोप आहे. आपल्याला कोणते क्षेत्र आवडते, त्याला प्राधान्य द्या,’’ असे मत लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केले.

‘सकाळ प्रकाशन’च्या ‘टॉपर बनण्याचा मूलमंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. त्या वेळी ते बोलत होते. जेईई परीक्षेतील यशवंतांच्या सत्यकथा सांगणारे हे पुस्तक सौम पॉल यांनी लिहिलेले आहे. त्याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ, प्रा. मनोज देवणे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रकाशनानंतर कहाते यांचे ‘स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ताण व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान झाले. तरुणाईच्या हाती असलेला स्मार्टफोन, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या समस्या, नकारात्मकता, ताण आदींचा संदर्भ देत या बाबींचे व्यवस्थापन आणि त्यावर मात कशी करावी, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचा उत्तरे दिली.

कहाते म्हणाले, ‘‘कोणत्याही वर्गाचा वा विषयाचा पाया कच्चा राहिला, तर पुढे कधी तरी त्याचा अडसर हा येतोच. त्यामुळे अधिक वेळ देऊन विषयाचा पाया पक्का करा. अभ्यासक्रम हा रटाळ वाटत असेल, तर त्यातील संकल्पना समजून घ्या. त्याशिवाय विषयातील गंमत समजणार नाहीत. अभ्यासक्रमासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. त्याला स्मार्टफोन मारक असतो. अभ्यास करायचा म्हणजे आरोग्य जपायचे नाही, असे करू नका. अभ्यास करून प्रगती करायची असेल, तर त्यासाठी आरोग्य जपले पाहिजे. त्यासाठी व्यायामाला प्राधान्य द्या.’’

Web Title: pune news Prioritize areas of interest