खासगी शाळांत मोफत औषध फवारणी हवी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - डेंगी, मलेरियाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी शाळांत महापालिकेने औषध फवारणी मोफत करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. खासगी शाळांना लाख-दीड लाख रुपयांचा खर्च परवडणारा नाही, असेही त्यात म्हटले आहे. 

डेंगी, मलेरियाचा सध्या मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. महापालिकेच्या शाळांत पालिका मोफत औषध फवारणी करते. परंतु, खासगी शाळांमध्ये औषध फवारणी करायचे झाल्यास पालिकेकडून 10 बाय 10च्या वर्गासाठी 350 किमान रुपये आकारले जातात. एका शाळेत अनेक वर्ग, सभागृहे असतात. त्यामुळे त्यांना लाख-दीड लाख रुपये बिल येऊ शकते. 

संसर्ग होण्याचे सध्याचे वातावरण लक्षात घेऊन किमान दोन महिने तरी खासगी शाळांत मोफत औषध फवारणी करावी. तेथील विद्यार्थीही पुणेकर असून ते महापालिकेचा कर भरतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्‍नाबाबत खासगी किंवा महापालिकेचे असा भेदभाव करू नये, अशी मागणी नगरसेवक राजेश येनपुरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. मोफत फवारणी करणे महापालिकेला शक्‍य नसल्यास किमान औषधे तरी मोफत द्यावीत, म्हणजे संबंधित शाळा उपकरणांची खरेदी करून फवारणी करतील, असेही येनपुरे यांनी म्हटले आहे.