शहरात दोन दिवसांत काही सरींचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे सोमवारी वर्तविण्यात आला. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असल्याने कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. 

शहरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला आहे. सोमवारीदेखील सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले होते. दिवसभरात शहराच्या बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. कमाल तापमानाचा पारा 1.8 अंश सेल्सिअसने कमी झाल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. शहरात 1 जूनपासून आतापर्यंत 177.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.