‘एसआरए’ कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) जनता वसाहतीत राबविण्यात येत असलेल्या ‘एसआरए’ प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. ते सर्वेक्षण पुन्हा करावे, नागरिकांची फसवणूक करून सर्वेक्षण करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे आणि गैरकारभाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी हजारो झोपडीधारकांनी गुरुवारी ‘एसआरए’ कार्यालयावर मोर्चा काढला. 

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) जनता वसाहतीत राबविण्यात येत असलेल्या ‘एसआरए’ प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. ते सर्वेक्षण पुन्हा करावे, नागरिकांची फसवणूक करून सर्वेक्षण करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे आणि गैरकारभाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी हजारो झोपडीधारकांनी गुरुवारी ‘एसआरए’ कार्यालयावर मोर्चा काढला. 

जनता वसाहतीमधील प्लॉट क्रमांक ५१९ पैकी सर्व्हे क्रमांक १०५, १०७, १०८, १०९ या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्यासाठी घरांचे सर्वेक्षण करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात असलेली घरे व दुकानांची संख्या सर्वेक्षणात कमी दाखविली असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. जनता चौक, टिळक रस्ता, भांडारकर रस्ता, सेनापती बापट रस्तामार्गे मुथा चेंबर्स येथील ‘एसआरए’च्या कार्यालयापर्यंत झालेल्या या मोर्चात हजारो रहिवासी सहभागी झाले. त्यात युवकांसह महिला, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. ‘एसआरए’ कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, सूरज लोखंडे यांच्यासह स्थानिक रहिवासी संस्था व मंडळांच्या अध्यक्षांनी ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांडुरंग पोले यांच्याकडे निवेदन दिले. २९४३ घरे दाखवून त्यातील ८८५ घरे ‘एसआरए’साठी पात्र केली आहेत, तर ४३ दुकाने दाखवून त्यापैकी केवळ १२ दुकानेच पात्र केली आहेत. ‘एसआरए’चे अधिकारी व विकसक यांच्या संगनमताने रहिवाशांची फसवणूक सुरू असल्याचे पत्रकामध्ये नमूद केले आहे. रहिवाशांना विश्‍वासात न घेता, जनजागृती न करता, घरे बंद असताना सर्वेक्षण करून फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. पारदर्शक पद्धतीने नवीन सर्वेक्षण करावे, पात्र-अपात्र न करता सर्वांना घर/ दुकाने द्यावीत, सध्याच्या ठिकाणीच पुनर्वसन करावे व गैरकारभाराची चौकशी करावी, अशा मागण्या रहिवाशांनी केल्या आहेत. 

जनता वसाहतीमधील रहिवाशांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्याची दखल घेतली आहे. बरेच जण अपात्र झाल्याची त्यांची तक्रार होती. त्यानुसार फेरसर्वेक्षण करण्यात येईल.
- पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी.

पुणे

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

10.48 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM

पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी...

03.03 AM