शिंदवणे घाटात सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

उरुळी कांचन - उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये शुक्रवारी (ता. 16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेवर आलिशान गाडीमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला.

उरुळी कांचन - उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये शुक्रवारी (ता. 16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेवर आलिशान गाडीमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला केडगाव चौफुला (ता. दौंड) परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गेली होती. घरी येण्यासाठी रात्री उशीर झाल्याने ती वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथे उभी होती. त्यावेळी त्या ठिकाणी आलिशान गाडीतून आलेल्या अजय नवले (रा. पारनेर, जि. नगर) व पक्‍या (पूर्ण नाव माहीत नाही) या दोन तरुणांनी सदर महिलेला गाडीमध्ये बसविले. गाडी शिंदवणे घाटामध्ये आली असता मारहाण करीत पक्‍या व नवले याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला घाटामध्ये सोडून दिले. तसेच घडलेली घटना कुठे सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी सदर महिलेने घाटातून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान, आरोपींनी गाडीसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीस्वारांनी तातडीने गाडीचा नंबर नोंद करून घेतला. तसेच पीडित महिलेला घेऊन लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली.