‘सुरक्षा कवच’साठी उद्यापर्यंत नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पुणे - सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाची नावनोंदणी करण्याची मुदत लोकाग्रहास्तव रविवार (ता. १८) पर्यंत वाढविण्यात आली आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येईल. 

पुणे - सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाची नावनोंदणी करण्याची मुदत लोकाग्रहास्तव रविवार (ता. १८) पर्यंत वाढविण्यात आली आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येईल. 

सर्वांसाठी एक लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही बिलात ७५ टक्के सवलत मिळणार आहे. नवीन सभासदांना १ ऑगस्टपासून आंतररुग्ण सेवा मिळेल. या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे. एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी सवलत मर्यादा एक लाख ८० हजार रुपये आहे. विविध चाचण्या व तपासण्यांच्या शुल्कात व औषधांवर १० ते ४० टक्के सूट मिळेल. सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. रविवार (ता. १८) सर्व केंद्रावर नोंदणी सुरू असेल. 

नोंदणीची ठिकाणे - सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल : डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता. सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड - वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल - शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ. सह्याद्री हॉस्पिटल हडपसर -मगरपट्टा कॉर्नर, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर. सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी - सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी. सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी - (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ. सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा. वेळ : सकाळी ९.३० ते सायं. ६.३० रविवार १८ तारखेनंतर मुदतवाढ होणार नाही

माझे वडील आजारी असताना त्यांना या योजनेचा फायदा झाला. खर्च कमी झाला. तसेच माझे स्वत:चे ऑपरेशन झाल्यामुळेही खर्चात मोठ्या प्रमाणात योजनेचा हातभार लागला. तुम्हीही सभासदत्व घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा.
- सतीश देशपांडे, लाभार्थी 

शुल्क भरण्याचा तपशील
१) वय ५० ते ६९ वर्षे पूर्ण केलेल्या गटासाठी - ३१०० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ३,१०० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 
२) वय ७० वर्षे व त्याहून अधिक, या गटासाठी - ४१५० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ४,१५० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 
सदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वय व निवासाचा दाखला आवश्‍यक. 
सर्व केंद्रांसाठी अधिक माहितीसाठी संपर्क : ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४ 
 संकेतस्थळ ः www.sahyadrihospital.com 

‘कॅशलेस प्रीमियम स्कीम’च्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या ‘नॉन- पेन्शनर’ लोकांना याचे वार्षिक मूल्य परवडण्यासारखे आहे. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या आहेत. पॅनेलवरील तज्ज्ञ डॉक्‍टर व्यवस्थित अडचणी समजावून आरोग्याच्या समस्या हलक्‍या करण्यास मदत करतात. कमी उत्पन्न गटासाठी ही योजना फायदेशीर आहे. सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम दर्जेदार असतात. 
- मेघमाला आगाशे, लाभार्थी

पुणे

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व...

05.21 AM

पुणे - शहरातील ‘प्रीमियम’ (मोक्‍याची जागा) व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता आणि ती मिळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे...

05.00 AM