रिक्षा परवान्यासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पुणे - गेल्या दीड महिन्यांपासून असलेली रिक्षाचालकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. सोमवारपासून (ता. ३१) रिक्षा परवान्यासाठी parivahan.gov.in या वेबसाइटवरून आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या वेबसाइटचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज करता येतील. या वेबसाइटवरून परवाना शुल्क, पोलिस खात्याचा चरित्र पडताळणी दाखला प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 

जून महिन्यामध्ये शासनाने रिक्षा परवाने खुल्या पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये रिक्षा परवान्याचा अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने इच्छुकांनी गर्दी केली. या इच्छुक नागरिकांच्या सोयीसाठी आणि आरटीओमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पुणे आरटीओ कार्यालयाने रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील, अशी सूचना केली. त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी दिल्ली एनआयसीकडून वेबसाइट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामध्ये दीड महिना गेल्यानंतर ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची प्रतीक्षा संपली आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अडचणीचे वाटत असेल त्यांच्यासाठी शासनाच्या अधिकृत नागरी सुविधा केंद्रामध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.