विस्तार वाढला; रस्ते धोकादायकच

विस्तार वाढला; रस्ते धोकादायकच

पुणे - दक्षिण पुणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंड्री-पिसोळी, खडी मशिन चौक, कोंढवा; तसेच इस्कॉन मंदिर ते कात्रज या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरात नागरीकरण वेगाने वाढत असले तरी पायाभूत सुविधांचा ठणठणाट आहे. या महामार्गावर अवजड वाहतूक आणि स्थानिक वाहनांची संख्या वाढली आहे; परंतु अतिक्रमणांमुळे अरुंद झालेले चौक, ठिकठिकाणी खड्डे, डांबरी साइडपट्ट्यांचे निकृष्ट दर्जाचे काम, रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार आणि पोलिसांकडून वाहतूक नियमनाऐवजी केवळ दंडवसुलीवर भर, या कारणांमुळे येथे अपघात होत आहेत. गेल्या दोन वर्षांत उंड्री ते कात्रज चौकापर्यंत अपघातात ६७ जणांचा बळी गेला आहे. 

उंड्री ते कात्रज रस्त्याचे रुंदीकरण करून नवीन प्रस्तावित रिंगरोडचे काम सुरू केल्यास येथील अवजड वाहतूक आणि अपघाताचे प्रमाणही कमी होईल. या भागातील लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महावितरण आणि वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन या महामार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उंड्री चौक व खडी मिशन चौकामध्ये अतिक्रमणे हटविण्यासोबतच काही खासगी जागा ताब्यात घेऊन चौकांचे रुंदीकरण करण्याची गरज आहे.

अपघाताची कारणे आणि उपाय
कात्रज-कोंढवा रस्ता
कात्रज-कोंढवा मार्ग हा उपनगरांसह मुंबई, सोलापूर; तसेच पुणे-बंगळूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या भागाचा महापालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे झाली तरी रुंदीकरण रखडले आहे. महापालिकेच्या जुन्या आणि नवीन विकास आराखड्यानुसार २८० फूट रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, सध्या रस्ता केवळ ६० ते ७० फूट आहे. रुंदीकरणासाठी आवश्‍यक असणाऱ्या ७० ते ८० टक्के जागांचेच हस्तांतर झाले आहे. उर्वरित जागेचे हस्तांतर रखडले आहे. शत्रुंजय मंदिरापासून खडी मशिन चौकापर्यंत दुभाजक नाहीत. या भागात अवजड वाहने भरधाव धावतात. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढले आहे. लोकप्रतिनिधींच्या राजकीय वादात आणि निविदा प्रक्रियेत रस्तारुंदीकरणाचे काम रखडले आहे.

उपाययोजना
 निविदा प्रक्रिया पूर्ण करून सहापदरी रस्त्याचे काम सुरू करणे गरजेचे   रस्त्याकडेची अतिक्रमणे हटविण्याची गरज   गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची गरज

उंड्री चौक 
अतिक्रमणे वाढल्यामुळे चौक अरुंद    भरधाव अवजड वाहनांमुळे अपघात   उंड्री चौकापासून धर्मावत पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याची दुरवस्था अन् सर्वत्र खड्डेच खड्डे   रस्त्याकडेला खडी पसरल्यामुळे अपघात   धर्मावत पेट्रोल पंपापासून खडी मशिन चौकापर्यंत सिमेंट रस्ता; मात्र दुभाजक नाहीत
रस्त्याकडेला डांबरी साइडपट्ट्यांचे निकृष्ट दर्जाचे काम
पथदिवे नसल्यामुळे रात्री अंधार

उपाययोजना
 उंड्री चौकातील अतिक्रमण हटवून रस्तारुंदीकरण करणे आवश्‍यक  खड्डे बुजवून रस्त्याकडेला पसरलेली खडी दूर करण्याची गरज  सिमेंट रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करणे गरजेचे  पथदिवे बसविणे आवश्‍यक

खडी मशिन चौक 
 अतिक्रमणांमुळे चौक अरुंद   चौकालगत अनधिकृत रिक्षाथांबे  येवलेवाडीकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे अपघात   अनेक वर्षांपासून सिग्नल बंद   चौकात वाहनांना थांबण्यासाठी स्टॉपलाइन नाही. त्यामुळे वाहनचालक भर चौकात थांबतात   पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणे अवघड   वाहतूक पोलिसांकडून चौकातच वाहने अडवून दंडवसुली

उपाययोजना 
अतिक्रमणे हटवून चौकाचे रुंदीकरण होणे महत्त्वाचे
तीव्र उतार कमी करण्याची गरज   साइड पट्ट्यांचे मजबूत डांबरीकरण करण्याची गरज   महापालिकेने चौकालगत पिसोळीच्या दिशेने पथदिवे बसविण्याची गरज
पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग आणि वाहनांसाठी स्टॉपलाइनची गरज   पोलिसांकडून वाहतूक नियमनावर भर देण्याची गरज

इस्कॉन मंदिरासमोरील चौक 
भरधाव वाहनांमुळे चौकात अपघात  वाहतूक पोलिस दंडवसुलीसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेले असतात 
गतिरोधकांचा अभाव
उपाययोजना 
चौकात वाहतूक नियमन होणे अपेक्षित  सिग्नल बसविणे गरजेचे  गतिरोधक बसविण्याची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com