आरटीओतील एका एजंटावर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामे करून देण्यासाठी एजंटांकडून अवास्तव पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी असल्या, तरी त्याविरोधात कोणीच कायदेशीर तक्रार करत नसल्यामुळे आजपर्यंत एजंटांवर कारवाई होत नव्हती; मात्र सोमवारी वाहन हस्तांतर व लायसन्सशी संबंधित कामासाठी आलेल्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडे अवास्तव पैशांची मागणी करण्यात आली. त्यावर त्या अधिकाऱ्याने आरटीओ प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित एजंटाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

गेल्या आठवड्यात परिवहन आयुक्तांनी आरटीओ परिसरातील एजंटांवर कारवाई करण्यासाठी विशेष वेशांतर मोहीम राबविण्याचा आदेश दिला होता. याअंतर्गत आरटीओतील अधिकारी व कर्मचारी वेशांतर करून आरटीओच्या परिसरातील एजंटांकडे ग्राहक बनून जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र आरटीओकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. असे असतानाच एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून जादा पैसे उकळण्याचा प्रकार घडला. त्या लष्करी अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर संबंधित एजंटावर कायदेशीर करवाई करण्यात आली. बंडगार्डन पोलिसांनी त्या एजंटाला ताब्यात घेतले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.