अवैध प्रवासी वाहतूक; आरटीओकडून 43 वाहने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी 83 वाहने दोषी आढळली असून, त्यापैकी 43 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी 83 वाहने दोषी आढळली असून, त्यापैकी 43 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

अवैध प्रवासी वाहतूक वाहनांविरोधात कारवाईसाठी आरटीओने सहा पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात चार मोटार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातदेखील आरटीओकडून ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये स्कूल बसवर कारवाई करण्यात आली होती. आज मात्र अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहराच्या विविध भागांत तीनशे वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जवळपास 83 वाहने दोषी आढळून आली. त्यापैकी 43 वाहने जप्त करून आरटीओ कार्यालय, कोथरूड आणि स्वारगेट डेपो येथील कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. या सर्व वाहनांकडून 67 हजार 710 रुपये इतका कर आणि 1 लाख 66 हजार 200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम या पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आरटीओने कळविले आहे.

Web Title: pune news RTO