...अन्‌ रसिकांची थिरकली पावले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - "गुंजी सी हैं सारी फिजा...', "चंदा रे चंदा रे...', "दमादम मस्त कलंदर...', "नीले नीले अंबर पे...' अशा गाजलेल्या गीतांचा नजराणा ख्यातनाम गायिका साधना सरगम यांनी सादर केला. या वेळी प्रत्येक गीताला "वन्स मोअर'ची दाद तर मिळतच होती. शिवाय, प्रत्येक गीतावर श्रोत्यांची पावलेही थिरकत होती. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात "साधना सरगम ः म्युझिकल नाइट' हा कार्यक्रम सादर झाला. यात साधना सरगम यांच्याबरोबरच राहुल सक्‍सेना यांनी मराठी-हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सुरेल स्वरात सादर केली. त्यामुळे रविवारची सायंकाळ श्रोत्यांसाठी अविस्मरणीय ठरली. साधना सरगम यांनी "गजानना श्री गणराया...' अशा भक्तीगीतांनी मैफलीची सुरवात केली. त्यानंतर "पहला नशा पहला खुमार...', "जब कोई बात बिगड जाए...', "हर किसीको नही मिलता...', "चुपके से लगजा लगे...' अशी गाजलेली गाणी सादर करून रसिकांची मने पुन्हा जिंकली. मंजिरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.