मेंदी स्पर्धेत शिल्पा बिराजदार प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’तर्फे आयोजित मेंदी स्पर्धेत शिल्पा धनराज बिराजदार (लोणी काळभोर, पुणे) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. शुभांगी सुहास बरिडे (पुणे) आणि स्वाती छगन दिघे (पुणे) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेसाठी प्रतिमा दुरुगकर, धनश्री हेंद्रे आणि बाबू उडुपी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या मेंदी स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातील काही भागांतून या स्पर्धेसाठी डिझाईन्स पाठवण्यात आली. यातून निवड केलेल्या शंभराहून अधिक मेंदी डिझाईन्सना ‘सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी विशेषांकात प्रसिद्धी देण्यात आली आहे. उत्तेजनार्थ, बालविभाग, संकल्पना-मेंदी (थीम बेस्ड), उल्लेखनीय अशा विभागांत या मेंदी डिझाईन्सचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

प्रियांका दीपक दबडे ही शंभर टक्के कर्णबधिर असून, तिचे डिझाईनही या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.