‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो’चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते; मात्र घराच्या किमतीपासून ते ताब्यापर्यंत असंख्य शंका मनात निर्माण होतात. अशा शंका दूर करून आपल्या आवडीचे, बजेटमधील घरांचे असंख्य पर्याय उपलब्ध करून देणारे ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो’ हे भव्य प्रदर्शन २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांचा यात समावेश आहे.    

रेंजहिल्स येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये हा एक्‍स्पो होणार आहे. येत्या शुक्रवारी (ता. २२) या एक्‍स्पोचे उद्‌घाटन होणार असून, रविवारपर्यंत (२४) सुरू राहणार आहे. यामध्ये तीसहून अधिक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये ‘महारेरा’ नोंदणीकृत असलेल्या १६० गृहप्रकल्पांचा समावेश आहे. 

या एक्‍स्पोद्वारे बजेट होम्सपासून ते लक्‍झुरीअस घर घेण्याची संधी गृहखरेदीदारांना मिळणार आहे. तीन दिवस चालणारा हा एक्‍स्पो सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असे. 

कधी - २२, २३ व २४ सप्टेंबर 
कुठे - कृषी महाविद्यालय मैदान, रेंजहिल्स  
वेळ - सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग मोफत