वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षकांच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांची नियुक्ती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात, मिलिंद गायकवाड यांची नेमणूक कोंढवा पोलिस ठाण्यात, तर कल्याण पवार यांची नेमणूक उत्तमनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांची नेमणूक वाहतूक शाखेत, संगीता पाटील यांची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात, प्रभाकर शिंदे यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात, तर अनिल पाटील यांची कोथरूड पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.