शनिवारवाड्याच्या डागडुजीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या बुरजांची डागडुजी, भिंतींना गेलेले तडे, आतल्या भागातील ढासळलेल्या वास्तुरचनांची पुनर्निर्मिती करण्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. हा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा, यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. 

सद्य:स्थितीत शनिवारवाड्याच्या तटबंदीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. तर बुरुजांवरील विटाही निघू लागल्या आहेत. आतील कारंजे तसेच सांडपाणी वाहिनीची स्थितीही चांगली नाही. तेथे पुरेशी विद्युत व्यवस्थाही नाही. या वास्तूला गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे असेल, तर निधीची आवश्‍यकता आहे. 

यासंदर्भात भारतीय पुरातनशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी ही अनौपचारिक चर्चा केली. तर निधीची उपलब्धता झाल्यास शनिवारवाड्यासंबंधीचे कामकाजाला सुरवात होऊ शकेल. तरी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात राज्य शासनाकडून तसेच काही निधी पुणे महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्यास हा ऐतिहासिक वारसा जतन करणे सोपे होईल. याबाबत भारतीय पुरातनशास्त्र विभागाशी संपर्क साधून हा निधी केंद्राकडून मिळविता येईल, असेही खर्डेकर यांनी म्हटले आहे.