ज्येष्ठांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणार : सुधीर दळवी

युनूस तांबोळी
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

टाकळी हाजी (शिरूर, जि. पुणे): "ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी करून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे'', असे प्रतिपादन "फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड'चे अधिकारी सुधीर दळवी यांनी केले.

कवठे येमाई (ता. शिरूर) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात "फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे, विस्तार अधिकारी प्रकाश आव्हाड, आरोग्य पर्यवेक्षक सुरेश लवांडे, अमोल फटाले, संदीप निमसाळे, बिमल चौधरी, एशियन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ""सामाजिक उपक्रम म्हणून फियाट कंपनीच्या माध्यमातून शिरूर तालुक्‍याच्या परिसरातील शाळांना शौचालय युनिट दिले. या भागात जलसंधारणाची कामे केल्याने पाणी अडवून जिरण्यास मदत झाली आहे. कोणताही निधी हा समाजाच्या उपयोगी पडावा यासाठी असतो. त्यामुळेच फियाट कंपनी जलसंधारण, शौचालय युनिट व मोफत शस्त्रक्रिया शिबिर असे कार्यक्रम राबवत असते.'' दयानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बी. डी. पठारे यांनी आभार मानले.