स्मार्ट सिटीचे सल्लागार पाच महिन्यांनंतर शहरात

स्मार्ट सिटीचे सल्लागार पाच महिन्यांनंतर शहरात

पुणे - स्मार्ट सिटीची अंमलबजावणी करणाऱ्या कंपनीने नियुक्त केलेले परदेशातील सल्लागार तब्बल पाच महिन्यांनी "मार्गदर्शन' करण्यासाठी बुधवारी शहरात आले. विशेष म्हणजे हे सल्लागार स्पेनमधील बार्सिलोना शहराचे माजी उपमहापौर आहेत. तर, नियुक्त झालेल्या अन्य सल्लागारांचा शोध स्मार्ट सिटी कंपनी अजूनही घेत आहे.

ऍन्टोनी वाईज यांनी आज शहरात औंध क्षेत्रीय कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात स्मार्ट सिटी कंपनीतर्फे सुरू असलेल्या कामांचीही पाहणी त्यांनी केली. मात्र, सुधारणा कोणत्या व्हायला हव्यात, कामाचे पुढचे स्वरूप काय असेल, याबाबत त्यांनी फारशी चर्चा केली नाही. स्मार्ट सिटीसाठी मॅकेंझी कंपनीमार्फत 14 सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश सल्लागार स्मार्ट सिटीच्या कामांकडे फिरकत नसल्यामुळे स्मार्ट सिटीच्या कंपनीने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना दिला जाणारा मोबदला थांबविला आहे. तो सुरू व्हावा, यासाठी मॅकेंझीकडून प्रयत्न सुरू असले, तरी त्याचा निर्णय आता 4 डिसेंबर रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत होणार आहे. बार्सिलोना स्मार्ट सिटी समजली जाते. ती घडविण्यात वाईज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मॅकेंझीमार्फत त्यांची पुण्यासाठी "चांगल्या' मानधनावर निवड झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची निवड झाली. मात्र, त्यानंतर ते तीनच वेळा पुण्यात आले होते. आता ते चौथ्यांदा शहरात आले आहेत. मॅकेंझीला 30 महिन्यांसाठी 38 कोटी रुपयांचा मोबदला स्मार्ट सिटी कंपनीमार्फत दिला जात आहे. मात्र, त्यांनी नियुक्त केलेले सल्लागार समाधानकारक काम करीत नसल्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी यापूर्वी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com