दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 29) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मूळ गुणपत्रिका ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याअंती विद्यार्थ्यांना मिळतील.

दहावीची फेरपरीक्षा 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झाली होती. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाची ऑनलाइन प्रत घेता येईल. राज्यभरातून 1 लाख 24 हजार 723 विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिली होती. फेरपरीक्षेच्या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणाची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची छायांकित प्रत जोडणे आवश्‍यक आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत प्राप्त करावयाची असेल, त्या विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या कालावधीत विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्‍यक आहे. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम
उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घ्यावी लागेल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: pune news ssc result online