पुण्यात गारमेंट हब सुरू करण्यासाठी प्रयत्न करू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - पुण्यात "गारमेंट हब' सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. वस्तूचे उत्पादन करणे सोपे; पण त्याची विक्री करणे अवघड असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

"पुणे गारमेंट फेअर'चे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, पुणे जिल्हा होजिअरी रेडिमेड हॅंडलूम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज सारडा, सचिव कल्पेश पोरवाल, वैभव लोढा आदी उपस्थित होते. 

""कपडे तयार करण्यासाठी कापूस लागतो. तो उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे लाभ होतो. या व्यवसायामुळे रोजगाराची संधी निर्माण होते,'' असेही देशमुख यांनी सांगितले. कापड व्यवसायवाढीला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्‍वासन कांबळे यांनी दिले.