वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - शहरात बुधवारी पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. 

सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्‍कन, स्वारगेट आणि शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर सकाळी दहापासून दुपारपर्यंत; तसेच सायंकाळीही वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल चौकातून रामकृष्ण मठ परिसर, सातारा रस्ता, नगर रस्ता, डेक्‍कन परिसर, आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, मंडई, पुणे रेल्वे स्टेशन; तसेच खडकी, मुंबई महामार्गावर वाकडेवाडी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. ओंकारेश्‍वर मंदिराजवळ नदीपात्रातील रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या भागात वाहतूक संथ गतीने सुरू होती. बंडगार्डन परिसरात नव्या पुलावर जाताना सुरवातीलाच कोपऱ्यात रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्यात वाहने गेल्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. दरम्यान संचेती चौक, संगमवाडी पूल, सीओईपी कॉलेजसमोरील रस्ता; तसेच अन्य काही भागातही वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Web Title: pune news traffic rain