मुलींना शिक्षण देण्यात आपला देश मागेच- विवेक ओबेरॉय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

प्रशासकीय व राजकीय प्रक्रियेमुळे सामाजिक कामात अडचणी येतात. त्यामुळे मी सरकारी मदत घेत नाही. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात मुलींच्या शिक्षणाचे काम सुरू आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात असे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुणे : "ग्रामीण भागात घरातील कामे, बाजमजूर, बालविवाह अशा विविध कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागात मुलींना शिक्षण देण्यात आपला देश अद्यापही मागे आहे." अशी खंत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी रविवारी व्यक्त केले. 

विद्यार्थी सेवा संघातर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परीषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संघाचे कणव चव्हाण, माजी आमदार कृष्णा हेगडे, महेश तपासे आदी उपस्थित होते.

ओबेरॉय यांनी आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, "तमिळनाडूत आलेल्या त्सुनामीमुळे पुनर्वसनाचे काम करताना सामाजिक कामाची जाणीव झाली. अभिनेता असल्यामुळे सामाजिक कामासाठीचा निधी व परवानग्यासाठी सोपे होते. शिक्षणातून मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास शक्य आहे, हे सामाजिक कामातून सिद्ध झाले. त्यादृष्टिने ग्रामीण भागात मुलींना शिक्षण देन्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे." 

प्रशासकीय व राजकीय प्रक्रियेमुळे सामाजिक कामात अडचणी येतात. त्यामुळे मी सरकारी मदत घेत नाही. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात मुलींच्या शिक्षणाचे काम सुरू आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात असे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चव्हाण म्हणाले, "चांगले काम करणाऱ्यांनी राजकरणात गेले पाहिजे, असे काही नाही. राजकारण व पदामुळे काम करणे सोपे होते. मात्र त्या कामाची मनापासून इच्छा असणे गरजेचे आहे."

Web Title: pune news vivek oberoi concerned over girls education