आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत उमटवली मोहर

वाघोली : दिल्ली येथील देशपातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गैारव करण्यात आला. शिक्षकासमवेत विद्यार्थी.
वाघोली : दिल्ली येथील देशपातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गैारव करण्यात आला. शिक्षकासमवेत विद्यार्थी.

वाघोली (पुणे): भारत सरकार महिला बालविकास मंत्रालयाने दिल्ली येथे घेतलेल्या देशपातळीवरील संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धेत पालघर जिल्हयातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून आपली मोहर उमटवली. वाघोली येथील भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुर्नवसन प्रकल्पात हे शिक्षण घेत आहेत. विद्यालयात आज (गुरुवार) त्यांचा गैारव करण्यात आला.

या स्पर्धेसाठी राज्यातून भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक पुर्ऩवसन प्रकल्पातील पाच विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने केली हेाती. त्यांना दिल्ली येथील स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. 19 व 20 नोव्हेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 100 मीटर धावणे या प्रकारात सागर विलास शिंगाडे याने सुवर्णपदक मिळविले. सागर विलास शिंगाडे, रुपेश सुरेश गुहे, अविनाश काकडया जनाठे व विजय गंगाराम सुतार यानी रिले स्पर्धेत सांघीक सुवर्णपदक मिळविले. गणेश शंकर तांडेल यानेही 100 मीटर धावणे स्पर्धेत सहभाग नोंदविला.

महिला व बालविकास केद्रींय राज्यमंत्री विरेंद्रकुमार व भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी पालघर जिल्हयातील अति दुर्गम आदीवासी भागातील असून पाचवी पासून येथील संकुलात शिक्षण घेत आहेत. त्यानी यापुर्वीही विविध स्तरावरील स्पर्धेत अनेक पदके मिळविली आहेत. त्यांना अंकुश घुगे, शामल थेारात, राजाराम पारधे, राहुल कदम, अण्णा लेाभे, अरुण सायकर या क्रीडा शिक्षकानी मार्गदर्शन केले.

वाघोली येथील भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुर्ऩवसन प्रकल्पात या विद्यार्थ्याना मेाफत शिक्षण देण्यात येत आहे. आज या सर्व विद्यार्थ्यांचा प्रकल्पात गैारव करण्यात आला. याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, सी. आय. केाचर, साईनाथ रापतवार, डॉ. संगीता लगड, प्राचार्य संतेाष भंडारी, दिलीप देशमुख, पांडुरंग पवार उपस्थीत हेाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com