पुणे: खडकवासला धरणातून 4280 क्यूसेक पाणी सोडले

राजेंद्रकृष्ण कापसे 
रविवार, 27 ऑगस्ट 2017

खडकवासला धरणातून 1.97 टीएमसी, पानशेत धरणात 10.65, वरसगाव धरणात 11.93 टीएमसी, टेमघर धरणात 1.61 टीएमसी पाणी जमा झाले आहे. चार ही धरणात मिळून 26.16 टीएमसी म्हणजे 89.73 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

खडकवासला : पानशेत धरण पूर्ण भरल्यानंतर शुक्रवारी रात्री धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळेच खडकवासला धरण 100 टक्के भरल्यानंतर शनिवारपासून पाणी सोडले जात आहे. रविवारी पहाटे 4 वाजता 4280 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे.

गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी चार धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे, पानशेत धरण शनिवारी पूर्ण भरल्यानंतर त्यामधून 990 क्यूसेक पाणी सोडण्यास सुरवात केली. त्याचबरोबर, वीज निर्मितीसाठी 690 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. 

आज सकाळपासून खडकवासला येथे 11मिलिमीटर पाऊस पडला तर पानशेत, वरसगाव धरण पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी 17 मिलिमीटर पाऊस पडला आहे. टेमघर येथे 35 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

खडकवासला धरणातून 1.97 टीएमसी, पानशेत धरणात 10.65, वरसगाव धरणात 11.93 टीएमसी, टेमघर धरणात 1.61 टीएमसी पाणी जमा झाले आहे. चार ही धरणात मिळून 26.16 टीएमसी म्हणजे 89.73 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.