‘ज्युनियर लीडर’चा आम्हालाही फायदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

पुणे - अभ्यास ही शालेय जीवनाची एक बाजू. त्या जोडीला अवांतर ज्ञान मिळाले तर बौद्धिक विकासाला ते पूरक ठरेल. शालेय जीवनात स्मृतीच्या कप्प्यात साठविलेल्या माहितीमुळे कोणत्याही प्रश्‍नाला थेट भिडून त्याची उकल करण्याची वृत्ती मुलांच्या अंगी बाणविली जाईल. ‘ज्युनियर लीडर’मधून हेच तर साध्य होतेय. मुलेच नव्हे; तर आम्हालाही त्याचा फायदा होतोय, अशा शब्दांत पालकांनी या सदराचे कौतुक केलेय.       

‘सकाळ’ने सुरू केलेले ‘ज्युनियर लीडर’ हे सदर मुलांच्या सामान्यज्ञानात भर पाडण्यासाठी उपयुक्त आहे. गणितकोडे, सुविचार, दिनविशेष हे सर्व विषय मुलांना आवडतात. त्यामुळे हे सदर मुलांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल. 
- सोनाली कुलकर्णी, अहिल्यादेवी मुलींचे हायस्कूल, शनिवार पेठ

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढण्यास या सदरामुळे मदत होईल. समाजात ‘लीडर’ होण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्‍वास तयार होईल. विविध विषयांवरील मार्गदर्शनपर सत्र बक्षीस स्वरूपात ठेवल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
- समरीन शेख, एसएनबीपी स्कूल, येरवडा

‘सकाळ’च्या अनेक नवनवीन व विद्यार्थिप्रिय सदरांमधील ‘ज्युनियर लीडर’ हे सदर मानाचा तुरा आहे. अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणारे हे सदर आहे. शाळा सुरू होत असताना अशा प्रकारे माहितीपूर्ण सदर सुरू केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही त्याचा फायदा होईल.
- नितीन दळवी, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग

या सदरामध्ये येणारी माहिती मुलांसाठी महत्त्वपूर्ण वाटते. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त होईल अशा पद्धतीचे हे सदर आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने, ‘सकाळ’चा हा उपक्रम अतिशय उपयुक्त वाटतो. 
- संतोष ढोरे, लॉयला इंग्लिश मीडियम स्कूल, पाषाण

जागरूक पालक या नात्याने या सदरामध्ये निश्‍चितच एक सकारात्मकता जाणवते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न या सदराच्या माध्यमातून ‘सकाळ’कडून होतो आहे आणि सध्याच्या काळात याची नितांत गरज होती.
- महेश राठी, बिशप्स स्कूल, उंड्री

मुलांच्या सामान्य ज्ञानात या सदरामुळे भर पडते. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होईल. तसेच, स्पर्धेतील बक्षिसे जिंकण्यासाठी ते विशेष प्रयत्न करतील.
- संदीप नागनाथ खडके, गंज पेठ