महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

ताराबाई पवार कसाळे गावात पण सामाजिक काम करत असत. त्यांनी चार रूग्णांना जीवदान व दोन रूग्णांना दृष्टीदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतर ही कायम ठेवला. श्रावण पवार सारख्या अशिक्षीत व इस्त्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करूण समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.

पुणे : मुंबईतील सर जेजे रूग्णालयात ब्रेन डेड रूग्ण ताराबाई श्रावण पवार या ४५ वयाच्या महिलेचे अवयवदान करण्यात आले असून, त्यामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे.

पाच दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदुचा रक्त पुरवठा अचानक थांबल्याने त्या बेशुद्ध झाल्या होत्या. दोन सप्टेंबरला त्यांना बेशुद्ध अवस्थेत सर जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार सप्टेंबरला त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यांचे पती श्रावण पवार जे कसाळे ता. कर्जत येथे व्यवसाय करतात. त्यांनी तसेच त्यांचा भाऊ अंकुश मोहीते व मुलगा गणेश यांनी त्यांचे अवयवदान करण्यासाठी संमती दिली. त्यानंतर अवयवदात्या ताराबाई पवार यांचे ह्रदय फोर्टीस रूग्णालयातील रूग्णास, लिव्हर अपोलो रूग्णालय नवी मुंबई येथील रूग्णास, एक किडनी ज्युपिटर रुग्णालयातील रूग्णास व दुसरी किडनी व दोन डोळे सर जेजे रूग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रूग्णास रोपन करण्यात आले.

ताराबाई पवार कसाळे गावात पण सामाजिक काम करत असत. त्यांनी चार रूग्णांना जीवदान व दोन रूग्णांना दृष्टीदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतर ही कायम ठेवला. श्रावण पवार सारख्या अशिक्षीत व इस्त्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करूण समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे. अवयवदान करण्यासाठी डाॅ. तात्याराव लहाने अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली, अधिक्षक डाॅ. संजय सुरासे व सहकारी, डाॅ. अजय भंडारवार व टीम,डाॅ भरत शहा व सहकारी, किडनी रोपण करणारे डाॅ. व्यंकट गिते व डाॅ. गिता सेठ व सामाजसेवा अधिकक्षक राठोड, सावरकर व पाटील, डाॅ. ननंदकर, डाॅ. विद्या नागर, डाॅ. मधुकर गायकवाड, डाॅ. विकास मैंदाड तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले. नेहमी प्रमाणे रामेश्वर नाईक यांनी रात्रभर जागुन हे जेजे रुग्णालयातील दुसरे अवयवदान यशस्वी केले. यासाठी मंत्री गिरीश महाजन हे स्वत: मार्गदर्शन करत होते. तसेच त्यांनी सर जेजे रूग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच महाजन यांनी सर जेजे रुग्णालयातील डाॅक्टर व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

Web Title: Pune news women organ donate