Women's Day : युवती, महिलांसाठी ऑनलाइन कार्यशाळा

‘चॅम्पियन द चेंज- संवाद महिलांचा, महिलांसाठी’ ही दोन दिवसीय ऑनलाइन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा झूम वेबिनार स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
Women's Day : युवती, महिलांसाठी ऑनलाइन कार्यशाळा
Summary

‘चॅम्पियन द चेंज- संवाद महिलांचा, महिलांसाठी’ ही दोन दिवसीय ऑनलाइन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा झूम वेबिनार स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त (World Womens Day) ‘सकाळ माध्यम (Sakal media) समूहा’तील यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) (YIN) प्रस्तुत व फाइन ज्वेलरी क्षेत्रातील जोस आलुक्कास यांच्या सहकार्याने सामाजिक बदल, महिलांचा विकास व उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर ‘चॅम्पियन द चेंज- संवाद महिलांचा, महिलांसाठी’ ही दोन दिवसीय ऑनलाइन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवार (ता. ११) व शनिवारी (ता. १२) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत झूम वेबिनार स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

‘चॅम्पियन द चेंज-संवाद महिलांचा, महिलांसाठी’ या उपक्रमास जोस आलुक्कास यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. शुक्रवारच्या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. माधुरी कानिटकर (लेफ्टनंट जनरल पीव्हीएसएम, एव्हीएसएम व व्हीएसएम सेवानिवृत्त) उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. तसेच, शनिवारच्या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

‘चॅम्पियन द चेंज- संवाद महिलांचा, महिलांसाठी’ ही मार्गदर्शनपर कार्यशाळा महिलांच्या समानतेसाठी आपल्या सर्वांची असलेली वचनबद्धता व कटिबद्धता, महिलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, महिलांसाठी विधायक कार्य सुरू करण्यासाठी, महिलांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी, समाजामध्ये प्रत्येक स्तरावर स्त्री-पुरुष समानतेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसेच, लैंगिक समानतेचे फायदे आणि बऱ्याच गोष्टी अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांसाठी व विशेषतः महाविद्यालयीन युवतींसाठी प्रोत्साहन, आत्मविश्‍वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या निवडक यशस्वी मार्गदर्शक महिला प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय, यामध्ये महाविद्यालयीन युवतींना त्यांच्या जीवनाचा रोडमॅप तयार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युवतींना महत्त्वाकांक्षी दृष्टी निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच युवती व महिलांना त्यांचे जीवन त्यांच्या सर्वोच्च क्षमतेनुसार जगण्यास मदत करणारे प्रकल्प सुरू करणे, हा कार्यशाळा आयोजन करण्याचा मुख्य हेतू आहे.

मार्गदर्शकांशी संवाद साधण्याची संधी

या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने बदल घडवण्याची इच्छा असलेल्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना व महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून मुली सर्वत्र शिकतील, नेतृत्व करू शकतील आणि स्वतःसोबत समाजाचा विकास करू शकतील. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्रात महाविद्यालयीन तरुणींना व महिलांना सहभागी होऊन विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, त्याचबरोबर मार्गदर्शकांना आपले प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com