पुणे: रामनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - वारजे माळवाडीमधील रामनगर परिसरात शुक्रवारी रात्री पूर्ववैमनस्यातून युवकाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.

पुणे - वारजे माळवाडीमधील रामनगर परिसरात शुक्रवारी रात्री पूर्ववैमनस्यातून युवकाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश मिसाळ (वय 22) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रामनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ कोयत्याने वार करण्यात आले, अशी माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी दिली आहे.
पूर्ववैमनस्यातून नितीन गायकवाड यानेच खून केल्याची माहिती मयत निलेश मिसाळ याच्या भावाने पोलिसांना दिली. गायकवाड व त्याचा पाच सहा जणांनी मिळून खून केल्याचे त्याने म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध जमाव जमवून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे देशमाने यांनी सांगितले.