शहरात उच्चांकी तापमान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - शहरात या हंगामातील आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद रविवारी झाली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. अशा रणरणत्या उन्हाच्या चटक्‍यात प्रचाराची सांगता झाली. मतदानाच्या दिवशी (ता. 21) आकाश निरभ्र राहणार असून, कमाल तापमानाचा पारा 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. 

शहरात प्रचाराचा शेवटचा दिवस असताना उन्हाची काहिली वाढली होती. आकाश निरभ्र असल्याने उन्हाची किरणे थेट जमिनीवर पडत होती. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला होता. अशातच उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत असल्याचे दृष्य शहरातील वेगवेगळ्या भागात दिसत होते. शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्यात सरासरीच्या तुलनेत 3.4 अंश सेल्सिअसने वाढ होऊन 35 अंश सेल्सिअसची नोंद झाली. किमान तापमानाचा पाराही 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. किमान तापमान सरासरीपेक्षा 1.4 अंश सेल्सिअसने वाढले असल्याचीही माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

मतदानाच्या दिवशी मंगळवारी (ता. 21) आकाश निरभ्र राहणार आहे. त्या दिवशी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.