रिमझिम पावसाने रविवारची आल्हाददायक सुरवात

टीम ई सकाळ
रविवार, 14 मे 2017

पहाटेपासूनच आलेल्या पावसामुळे आल्हाददायक वातावरणात पुणेकरांच्या रविवारची सुरवात झाली. 

पुणे : शनिवारी दुपारनंतरचे ढगाळ वातावरण..., चमकणाऱ्या विजा आणि कडकडाट, काही ठिकाणी पाऊस आणि विजेअभावी अंधारात बुडालेले शहर.., आणि नंतर रिमझिम पाऊस.. पहाटेपासूनच आलेल्या पावसामुळे आल्हाददायक वातावरणात पुणेकरांच्या रविवारची सुरवात झाली. 

रविवार आणि सोमवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याप्रमाणे पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहराच्या बहुतांश भागांमध्ये अंधार होता. त्यामुळे पुणेकरांनी 'कँडल लाईट डिनर'चा अनुभव घेतला. काही भागांमध्ये मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. 

पुणे विभागात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता. या विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश आहे. परिणामी, विहिरीच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली होती. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपसा केल्याने पुन्हा पाणी पातळी खोल जाऊ लागली आहे. त्यामुळे पाणी टंचाईने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. 

व्हिडीओ गॅलरी