"रेडिओ एफटीआयआय'चा दशकपूर्ती सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - ""भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी या दोघांकडेही देशाप्रती एक दूरदृष्टी होती. द्रष्टेपणा होता. या दोघांनी भारतात रुजू पाहणाऱ्या अणू आणि अंतराळ युगासाठी वैज्ञानिकांना सर्व प्रकारची पावलं उचलण्यास "फ्री-हॅण्ड' दिल्यानेच भारतात विज्ञानपर्व रुजू शकले,'' अशा शब्दांत "इस्रो'चे माजी संचालक आणि "एफटीआयआय'चे माजी उपाध्यक्ष डॉ. ई. व्ही. चिटणीस यांनी नेहरू आणि इंदिराजीबद्दल गौरवोद्गार काढले. 

"रेडिओ एफटीआयआय'च्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त सोमवारी झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात चिटणीस बोलत होते. या वेळी "एफटीआयआय'चे संचालक भूपेंद्र कैंथोला, निबंधक वरुण भारद्वाज, "रेडिओ एफटीआयआय'चे संजय चांदेकर, प्रा. अमित त्यागी आदी उपस्थित होते. 

चिटणीस म्हणाले, ""आजच्यासारखा लाल फितीचा कारभार त्या वेळी नव्हता. विशेषतः विज्ञान-तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची कामे प्रशासनाकडून चटकन केली जात असत. "हव्या त्या सुविधा घ्या, हव्या त्या देशात जाऊन नवे तंत्रज्ञान शिकून या, हवं ते मुक्तपणे करा आणि नवा भारत उत्तुंग घडवण्यात योगदान द्या...' असा नेहरू आणि इंदिराजींचा दृष्टिकोन होता. प्रसंगी अपयशातही ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत. त्याला अर्थातच होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्यासारख्यांनी त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पुढे नेले.'' 

इंदिराजींकडे दोन तास! 

चिटणीस म्हणाले, ""ज्या वेळी आम्ही "खेडा' या राष्ट्रीय प्रकल्पासाठी काम करत होतो, त्या वेळी एकदा आम्हाला इंदिराजींच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची संधी मिळाली. आमचे काम आम्ही कसे करतो, आमचे कार्यक्रम कुठले असतात, हे तब्बल दोन तास बाईंनी आमच्याकडून जाणून घेतले होते. त्यांना आमच्या कामाविषयी उत्सुकता होती.''

Web Title: radio FTII