"मनसे'च्या जाहीरनाम्याचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - बसगाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढवणार, स्वस्त दरात "पीएमपी' सेवा पुरवणार, प्रभागनिहाय आरोग्य केंद्रांची उभारणी, महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना, शहराला 24 तास पाणीपुरवठा, तसेच महापालिकेची स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी विकेंद्रीकरण व क्षेत्र सभेची अंमलबजावणी करण्याचा "निश्‍चय' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे. 

"आमचा निश्‍चय' या नावाने मनसेच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि सुशासनाच्या मुद्‌द्‌यांवर भर दिला आहे. 

आरोग्य ः 
- प्रभागनिहाय आरोग्य केंद्रांची उभारणी. 
- महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार. 
- 24 तास पाणीपुरवठा. 
- ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा. 

वाहतूक ः 
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार. 
- प्रवाशांच्या संख्येनुसार मार्गिका आखणार. 
- "पीएमपी' आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार. 
- रस्ते, वाहनतळ, पदपथाच्या सुविधा निर्माण करणार. 

शिक्षण ः 
- प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सातत्याने शैक्षणिक मूल्यमापन करणार. 
- शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवून उत्तम इंग्रजी भाषा शिक्षण देणार. 
- शिकण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री वेळेवर पुरवणार. 

पर्यटन ः 
- पर्यटनाच्या माध्यमातून महापालिकेचा महसूल वाढविणार. 
- शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक पाऊलखुणा विकसित करणार, पर्यटक आकर्षित करणार. 

सुशासन ः 
- महापालिका सभागृहात कामकाज नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणार 
- अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणार 
- प्रशासनाचे विकेंद्रीकरण व क्षेत्र सभेची अंमलबजावणी करणार. 

Web Title: Raj Thackeray inaugurated the publication of the Declaration