अन्‌ झाले "तेजस', "सिब्बू'चे दर्शन ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

कात्रज/पुणे - जंगलच्या राजाने खंदकात दमदार प्रवेश केला... डावीकडे ऐटीत मान वळवून पर्यटकांना आपले दर्शन दिले आणि एवढा वेळ श्वास रोखून थांबलेल्या पर्यटकांनी क्षणार्धात "तेजस' असे नाव पुकारत एकच जल्लोष सुरू केला ! आपल्या आई-बाबांच्या खांद्यावर बसून सिंहाला पाहण्यास आतूर झालेल्या बाळगोपाळांनी तर टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. गेले साडेतीन महिने राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झालेल्या तेजस आणि सिब्बू या सिंहांच्या जोडीला पाहण्यासाठी ही सारी उत्कंठा शिगेला पोचली होती. 

गेले अनेक दिवस ज्यांची झलक पाहण्यासाठी पुणेकर उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते, त्या जंगलच्या राजाचे दर्शन रविवारी पुणेकरांना घडले. त्याचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व, चालण्यातील ऐट आणि त्याच्या एकूणच हालचाली टिपण्यासाठी, त्या कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त करण्यासाठी अनेक नागरिकांनी बच्चे कंपनीसह पहिल्याच दिवशी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सिंहांना एवढ्या जवळून पाहायला मिळणार असल्यामुळे चिमुकले हरखून गेले होते. 

दरम्यान, प्राणी दत्तक योजनेचा भाग म्हणून उद्योजक केदार कासार यांनी प्राणिसंग्रहालयात दाखल झालेल्या सिंहांच्या जोडीला वर्षभरासाठी दत्तक घेण्याचा पहिला मान पटकावला. उद्योजक म्हणून प्राणी दत्तक घेणारे कासार हे पहिले प्राणिमित्र ठरले. कासार यांनी सिंह जोडीच्या वर्षभरासाठीच्या पालन- पोषणासाठी चार लाख रुपयांचा धनादेश प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. 

आता नव्या जागेत रमावे लागणार... 
पर्यटकांना मनमुराद पाहता यावे, यासाठी प्राणिसंग्रहालयातील वातावरणात स्थिर झालेल्या या जोडीला रविवारी सकाळी खंदकात सोडण्यात आले. सर्वप्रथम तेजस खंदकात आला, त्याने पर्यटकांकडे दमदार कटाक्ष टाकला, पंधरा पावले पर्यटकांच्या दिशेने येऊन काही अंतर वावरला आणि नाइट हाउसमध्ये परतला. त्यानंतर सिब्बू बाहेर आली, तिच्यापाठोपाठ पुन्हा तेजस बाहेर आला. नाइट हाउसचा लोखंडी दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकून तेजसने मागे वळून पाहिले आणि त्याला कळून चुकले, की आणखी एका नव्या जागेत आता रमावे लागणार. 

Web Title: rajeev gandhi zoo