स्वामी विवेकानंदांची शिकवण सकारात्मक मानसिकतेसाठी आवश्यक - मुक्ता टिळक

गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे आयोजित भगिनी निवेदिता यांची 150 वी जयंती वेगवेगळी व्याख्यानांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवासांत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरूवात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले. शिबिराची सुरूवात करताना त्यांनी स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांचे संदर्भ देऊन गणेशोत्सव व विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाचे महत्व सांगितले. व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी उद्योग, शेती आदी विभागांवर लक्ष देण्याची गरज असून त्याचवेळी अध्यात्मिक विकास व नैतिकता यांची सांगड घालण्याची गरज असल्याचे सांगितले. तर या दोन दिवसांच्या शिबिराची सांगता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या व्य़ाख्यानाने झाली.  

भगिनी निवेदिता यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिराचा समारोप

पुणे : पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे आयोजित भगिनी निवेदिता यांची 150 वी जयंती वेगवेगळी व्याख्यानांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवासांत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरूवात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले. शिबिराची सुरूवात करताना त्यांनी स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांचे संदर्भ देऊन गणेशोत्सव व विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाचे महत्व सांगितले. व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी उद्योग, शेती आदी विभागांवर लक्ष देण्याची गरज असून त्याचवेळी अध्यात्मिक विकास व नैतिकता यांची सांगड घालण्याची गरज असल्याचे सांगितले. तर या दोन दिवसांच्या शिबिराची सांगता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या व्य़ाख्यानाने झाली.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण मठ व मिशनच्या बेलूरचे मुख्यालयाचे सहाय्यक सचिव स्वामी अभिरामानंद महाराज होते. जे लोकांना, समाजाला जोडते ते चांगले असते. असे म्हणून ते म्हणाले, संक्रिय व निष्क्रीय हे दोन घटक सांगतानाच संक्रीय घटकाने सकारात्मक असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याचवेळी त्यांनी विवेकानंद व भगिनी निवेदिता या गुरूशिष्यातील नात्याचे महत्व सांगताना, निवेदिता यांचा संघर्षही कथन केला. यापूर्वी रामकृष्ण मठ पुण्याचे प्रमुख स्वामी श्रीकांतनंद महाराज यांनी मठ चालवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तर बुद्धानंद यांनी आभार मानले. 

यावेळी मकरंदबुवा रामदासी यांचे कीर्तनही झाले. नरसिहानंदजी, शुद्धीदानंदजी यांची व्याख्याने झाली. यावेळी गंधार व कस्तुरी देशपांडे या भावाबहिणीने शास्त्रीय गायनाचा कार्यक्रमही सादर केला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पुप्पल यांनी केले. या दोन्ही दिवसांच्या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातील मठ चालवत असलेल्या उपक्रमांचे विविध मान्यवरांनी कौतुक केले. हे शिबीर य़शस्वी करण्यासाठी मठातील सदस्य, स्वयंसेवक यांनी अपार मेहनत घेतल्याचे यावेळी मान्यवरांनी कौतुकाने सांगितले. 

Web Title: ramkrishna math pune two days workshop esakal news