तोंडाला पाणी सोडणारा रानमेवा बाजारात दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

चिंच, आवळा, बोरे, जाम, कैरीला मागणी
पुणे - वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेतही पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा... जिभेवर ठेवताच तासन्‌तास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण नेहमी उन्हाळ्यात होतेच होते.

विलायती चिंच, आवळा, बोरे, जाम, निंबोळ्या, तिखट मीठ लावलेली तोतापुरी कैरीची चवही काही न्यारीच... उन्हाळा सुरू झाल्याने जिभेचे चोचले पुरविणारा हा रानमेवा बाजारात आला असून, शहरात फेरफटका मारताना तो हमखास नजरेस पडू लागला आहे.  

मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, मंचर, जुन्नर येथून यंदाही हा रानमेवा आला आहे. याचे वैशिष्ट्यही निराळे. त्याची गोड, आंबट-तुरट चव जिभेवर रेंगाळत राहते. गुणकारी रानमेवा मुळातच औषधी. इतरवेळी जंकफूड, चाटसारख्या पदार्थांवर ताव मारणारी तरुणाई आता मात्र बाजारात आलेल्या रानमेव्यावर ताव मारताना दिसत आहे. पाच ते २० रुपयांपर्यंत मिळणारा हा रानमेवा सामान्यांच्या खिशालाही परवडणाराच आहे. 

तांबडे तिखट आणि मीठ मसाला लावलेल्या चिंचा, गोड चिंचा, तोतापुरी कैरीचे काप, मीठ लावून उन्हात वाळविलेली बोरे खायचा मोह कोणाला नाही होणार? 

मावळ, मुळशी येथून आम्ही रानमेवा आणतो. जांभूळ आणि करवंद मात्र अजूनही बाजारात यायची आहेत. पण, विलायती चिंच असो की, आवळा आणि कैरीला मागणी असतेच. तिखट मीठ लावलेला रानमेवा ग्राहकांचा आवडीचा पदार्थ आहे.
- संगीता भोगम, रानमेवा विक्रेत्या

Web Title: ranmeva in market