रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 17 मार्च 2018

खडकवासला (पुणे) : रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय खडवासला येथे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांची ८८वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.

आभाळाएवढे जिला लाभले मन अशी आमुच्या रयत माऊली लक्ष्मीबाईच्या कार्याची महती विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय बांदल यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या विद्या पवार यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्कुल कमिटी सदस्य विजय भाऊ हे उपस्थित होते.

विद्यार्थी मनोगतात चेतना पवार, काजल गायकवाड, तेजस्वी बाविस्कर यांनी लक्ष्मीबाई बद्दल आपले मत मांडले. सूत्रसंचालन साक्षी मते हिने केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या शिक्षिका वंदना भांबुरे यांनी केले.

Web Title: Rayat Mauli Laxmibai patil tribute on their death anniversary

टॅग्स