आपटळे-घाटघर रस्त्यावरील मोरीचा भराव खचला

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 6 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : आपटळे-घाटघर रस्त्यावरील फांगुळगव्हाण ता.जुन्नर येथील मोरीचा भराव आज (ता.06) सकाळी खचला असल्याचे घाटघर ग्रामपंचायत सदस्य नंदू पानसरे यांनी सांगितले.

जुन्नर (पुणे) : आपटळे-घाटघर रस्त्यावरील फांगुळगव्हाण ता.जुन्नर येथील मोरीचा भराव आज (ता.06) सकाळी खचला असल्याचे घाटघर ग्रामपंचायत सदस्य नंदू पानसरे यांनी सांगितले.

गेले दोन दिवस येथे चांगला पाऊस होत आहे.रस्त्याचा हा भाग खाली असल्याने सर्व बाजूने वाहत येणारे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. डोंगर उतारावरून वेगाने पाणी वाहत येत असल्याने भराव खचला असून पावसाचा जोर कायम राहिला तर रस्ता व मोरी वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे मोठ्या पुलाची गरज असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे. फांगुळगव्हाण ते घाटघर हा सुमारे अडीच  किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीस निरुपयोगी झाला आहे. नाणेघाट येथे येणारे पर्यटक देखील या रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त करतात रस्त्याचे किमान खडीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: road slide at aatpale ghatghar road