आधी हात जोडले...मग दानपेट्याच फोडल्या! पुण्यातील शितळादेवी मंदिरात चोरी

आधी हात जोडले...मग दानपेट्याच फोडल्या! पुण्यातील शितळादेवी मंदिरात चोरी

पुण्यातील कर्वेनगर भागातील प्रसिद्ध शितळादेवी देवस्थानात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील कोथरूडनजीक असलेल्या कर्वेनगर परिसरात शितळादेवी-भैरवनाथाचं मंदीर आहे. मोठ्या प्रमाणात भाविक याठिकाणी भेट देत असतात.(Shitaladevi temple from pune robbed)

आधी हात जोडले...मग दानपेट्याच फोडल्या! पुण्यातील शितळादेवी मंदिरात चोरी
पुण्यात सार्वजनिक शौचालयात बलात्कार, पाठलाग करून नराधमाने साधला डाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने मंदिरात प्रवेश केला. आधी हात जोडले आणि नंतर दानपेट्या फोडल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. विशेष म्हणजे मंदिराच्या शेजारीच कर्वेनगर पोलीस चौकी आहे. ४ दानपेट्या फोडून चोरट्याने ७५,००० रुपये लंपास केले आहेत. तसेच मंदिरातील घंटा देखील चोरुन तो पसार झालाय. (Pune Crime News)

काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार कर्वेनगर तसेच हिंजवडी मध्ये असलेल्या मंदिरात घडला होता. यानंतर आता शितळादेवी मंदिरातही चोरी झाल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com