वाघोलीत बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरी

वाघोलीत बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरी

वाघोली - बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून कपाटातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना सोमवारी वाघोलीतील आव्हाळवाडी रोड वरील कोझी होम सोसायटीमध्ये घडली. 

या प्रकरणी अरविंद बाबूलाल चतुर्वेदी ( वय 32  ) यांनी फिर्याद दिली. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, चतुर्वेदी पती पत्नी 14 सप्टेंबर रोजी त्यांच्या गावी इंदोर येथे गेले होते. फ्लॅटची चावी त्यांनी त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या दीपक शर्मा याच्या कडे दिली होती. त्यांच्या मित्राला त्यांची दुचाकी लागत असल्याने दुचाकीची चावी काढण्यासाठी शर्मा व मित्र  सोमवारी दुपारी फ्लॅट कडे गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ही बाब अरविंद याना कळविली. ते पती पत्नी दुसऱ्याच दिवशी इंदोर येथून वाघोलीत पोहचले. त्यांनी फ्लॅट उघडून बघितला असता कपाटातील सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. कपाटातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये कर्णफुले, गळ्यातील हार, बांगड्या, नेकलेस, चैन व रोख 20 हजार रुपये याचा समावेश आहे. लोणीकंद पोलिस पुढील तपास करीत आहेत.

समोरील युवक गायब
चतुर्वेदी यांच्या समोरील फ्लॅट मध्ये चार ते पाच बॅचलर युवक राहत होते. दोन ते तीन महिन्यापूर्वीच ते राहण्यास आले होते. चोरी झाल्यापासून ते सर्व जण गायब असून त्यांचे मोबाईल ही बंद आहेत. असे चतुर्वेदी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com