आरपीआयकडून 108 जणांना अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) सुमारे 108 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत; तर पंधरा प्रभागांमध्ये तब्बल चार ते सहा इच्छुकांनी अर्ज घेतल्याने पक्षामध्येच चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. 

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) सुमारे 108 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत; तर पंधरा प्रभागांमध्ये तब्बल चार ते सहा इच्छुकांनी अर्ज घेतल्याने पक्षामध्येच चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. 

पक्षाने सात ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये इच्छुकांसाठी अर्ज देण्यास प्रारंभ केला होता. इच्छुकांची संख्या वाढल्याने अर्जविक्रीस आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीमध्ये इच्छुकांनी 108 अर्ज घेतले. यापैकी 65 जणांनी तत्काळ अर्ज भरून देण्यास प्राधान्य दिले. इच्छुकांमध्ये पक्षाचे नेते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते डॉक्‍टर, वकील, पत्रकारांचाही समावेश आहे. प्रभाग क्रमांक एक ते सहा, आठ, सोळा, 19, 20, 21, 26, 28, 30, 36, 37 या प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या सहापर्यंत गेली आहे. या प्रभागांमधील इच्छुकांनी पक्षाचे अर्ज नेले आहेत त्यांच्याकडून लवकरच हे अर्ज भरून दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे म्हणाले, ""पक्षाची ताकद असलेल्या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी तयारी केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चशिक्षित उमेदवारही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील.'' 

पुणे

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM