मनसोक्त खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कृषी महाविद्यालयाचे मैदान (रेंजहिल्स) - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला शनिवारी खरेदीसाठी झालेली गर्दी.
कृषी महाविद्यालयाचे मैदान (रेंजहिल्स) - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला शनिवारी खरेदीसाठी झालेली गर्दी.

पुणे - खात्रीशीर, आरामदायी आणि मनसोक्त खरेदीचा आनंद देणाऱ्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला शनिवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नावीन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने आणि विशेष सवलती देणाऱ्या या प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटला. रविवारी (ता.२२) सुटीचा दिवस असल्याने महोत्सवात भरघोस सवलती आणि एक्‍स्चेंज ऑफर्सचे निमित्त साधता येणार आहे. 

विविध कंपन्यांची दर्जेदार उत्पादने, पाचशेहून अधिक स्टॉल्स, भरघोस सवलती आणि एक्‍स्चेंज ऑफर्सची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शनिवारी सुटीचा दिवस असल्यामुळे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारीही सुटीचे निमित्त साधून पुणेकरांना फर्निचरपासून ते किचन अप्लायन्सेसपर्यंतच्या अनेक वस्तू खरेदी करता येणार आहेत.

प्रदर्शनात वैविध्यपूर्ण आणि डिझायनर फर्निचरचा नजराणा सादर करण्यात आला असून, जोडीला आकर्षक पडदे व चादरी इत्यादी साहित्यदेखील उपलब्ध आहेत. महिला-तरुणींसाठी किचन अप्लायन्सेसच्या जोडीला गृहसजावटीच्या अनेक वस्तू उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने, कपडे, डिझायनर दागिने, फूटवेअर अशा वस्तूही पाहायला मिळतील; तर पुरुषांसाठी कपडे आणि फूटवेअरमधील विविध प्रकार पाहता येतील.

सोफा सेट्‌सपासून ते पेंटिंग्जपर्यंतच्या फर्निचर आणि इंटेरियरमधील प्रकारही आकर्षित करतील. गृहसजावटीच्या वस्तूंमध्ये फुलदाण्या, दिवे, पेंटिंग्ज, म्युरल्स, फ्रेम्स असे कित्येक प्रकार पाहता येतील. या जोडीला फॅशन ॲक्‍सेसरीज, खेळणी आणि गेम्स, गिफ्ट आणि नॉव्हेल्टीज, हेल्थ प्रॉडक्‍टही पाहायला मिळणार आहेत. लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वादही सुटीच्या दिवशी खवय्यांना घेता येईल. नवी उत्पादने, गुणवत्ता आणि उत्तम दर्जा हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. 

अधिक माहिती
कालावधी - २९ जानेवारीपर्यंत
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ - कृषी महाविद्यालयाचे मैदान (सिंचननगर), रेंजहिल्स 
पार्किंग व प्रवेश मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com