लाइव्ह शोसाठी पुणेकर तरुणांची उत्सुकता शिगेला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ 28 आणि 29 एप्रिलला
पुणे - तरुणांच्या तुफान आवडीचे गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पुण्यात होणारा गायक, संगीतकाराची लाइव्ह कॉन्सर्ट आता आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी तरुणांची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तरुणाई आणि बॉलिवूडला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे.

‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ 28 आणि 29 एप्रिलला
पुणे - तरुणांच्या तुफान आवडीचे गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पुण्यात होणारा गायक, संगीतकाराची लाइव्ह कॉन्सर्ट आता आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी तरुणांची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तरुणाई आणि बॉलिवूडला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग व बादशाह त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सह प्रायोजक सुझुकी इन्ट्रयुडर, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आहेत.

मी व माझे मित्रमैत्रिणी बादशाहचे गाणे ऐकायला उत्सुक आहोत. आमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. हा इव्हेंट खूपच वेड लावणारा असेल. 
- सानिका रानडे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर

पुण्यात होणारा हा मोठा कॉन्सर्ट असेल. बादशाहचा परफॉर्मन्स पाहायला आणि त्याची आत्ता गाजत असणारी गाणी प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.
- सूर्या शर्मा, फूड अँड लाइफस्टाईल ब्लॉगर

चार बॉलिवूड सेलिब्रिटी एकाच वेळी, एकाच कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या तरुणांच्या आवडत्या सोशल मीडियावर मी व माझी टीम पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. 
- गॅविन, अँकर, होस्ट

कार्यक्रमातील परफॉर्मन्स पाहता, मला वाटते ‘समरसॉल्ट’ला एप्रिलच्या भर उन्हाळ्यातले हिमवादळ म्हणावे लागेल. फरहानला ऐकायला मी फार उत्सुक आहे.  
- रुचा आपटे, अभिनेत्री

सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018 
 शनिवार - २८ एप्रिल 
 सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
 रविवार - २९ एप्रिल 
 सहभाग - मिका सिंग, बादशाह 
 कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
 केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
 ऑनलाइन बुकिंगसाठी - Bookmyshow.Com 
 अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५ 

प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध 
 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (सकाळी ९ ते ११.३०, सायंकाळी ५ ते रात्री ८) 
 ‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६) 
 गिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत) 
 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (सकाळी ११ ते सायंकाळी ५).

Web Title: sakal times summersault 2018 event live show youth