आणखी तीन ठिकाणी प्रवेशिका काउंटर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - उसळती तरुणाई आणि बॉलिवूडला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा हॉटेस्ट लाइव्ह शो २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. उत्साही पुणेकरांसाठी या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सहज उपलब्ध होण्यासाठी खराडी, हिंजवडी आणि भांडारकर रस्ता अशा आणखी तीन ठिकाणी अतिरिक्त सोय केली आहे. 

पुणे - उसळती तरुणाई आणि बॉलिवूडला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा हॉटेस्ट लाइव्ह शो २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. उत्साही पुणेकरांसाठी या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सहज उपलब्ध होण्यासाठी खराडी, हिंजवडी आणि भांडारकर रस्ता अशा आणखी तीन ठिकाणी अतिरिक्त सोय केली आहे. 

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग व बादशाह त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सह प्रायोजक सुझुकी इन्ट्रयुडर तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आहेत.

सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८
 शनिवार - २८ एप्रिल 
 सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
 रविवार - २९ एप्रिल 
 सहभाग - मिका सिंग, बादशाह 
 कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
 केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
 ऑनलाइन बुकिंगसाठी : bookmyshow.com
 अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५ 

 प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध
 कोठे - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (सकाळी ९ ते ११.३०, सायंकाळी ५ ते रात्री ८)
 ‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६)
 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (सकाळी ११ ते सायंकाळी ५)
 गिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत)

Web Title: sakal times summersault 2018 event ticket counter