संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्लास्टीक कचरा 70 टक्क्यांनी घटला

रमेश वत्रे
गुरुवार, 12 जुलै 2018

सरकारचा निर्णय काय असेल तो असेल मात्र गावकरी व वारकऱ्यांनी प्लास्टीकला दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले. वारीत चहा, पोहे, उपमा, बुंदी, खिचडी सारखे पदार्ध वाटप करण्यासाठी गावकऱ्यांनी कागदी साहित्याचा वापर केल्याने ते साध्य झाले आहे.

केडगाव - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावर प्लास्टीक यंदा सत्तर टक्के घटलयं. खरे न वाटरणारे सत्य पालखी मार्गावरील गावकरी व वारकरी यांच्या जागृतीमुळे ते शक्य झाले आहे. 
       
सरकारची प्लास्टीक बंदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. प्लास्टीक बंदीला विरोध झाल्याने सरकारने प्लास्टीक बंदी शिथील केली आहे. सरकारचा निर्णय काय असेल तो असेल मात्र गावकरी व वारकऱ्यांनी प्लास्टीकला दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले. वारीत चहा, पोहे, उपमा, बुंदी, खिचडी सारखे पदार्ध वाटप करण्यासाठी गावकऱ्यांनी कागदी साहित्याचा वापर केल्याने ते साध्य झाले आहे. वारकऱ्यांनी व गावकऱ्यांनी प्लास्टीक बंदी गांभीर्याने घेतल्याने रस्त्यावरच प्लास्टीक निर्मुलन झाल्याचे वास्तव यामुळे समोर आले आहे. या बदलामुळे वारीच्या वाटीवरील प्लास्टीकचा खच यंदा दिसला नाही. हा बदल बोरीभडक ते रोटी (ता. दौंड) दरम्यान अनेकांच्या लक्षात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.  
   
या पालखी सोहळ्यात सुमारे चार लाख वारकरी सहभागी झालेले असतात. या वारकऱ्यांना रोजच्या वापरासाठी प्लास्टीकचा मोठा वापर होत असतो. पिण्याचे पाण्याचे ग्लास, थर्माकोलची पत्रावळी, चहाचे ग्लास, अन्न पदार्थांचे पॅकिंग यांचा मोठा वापर रोज वारीच्या वाटेवर होत असतो. सर्व प्लास्टीक वापरा आणि फेका असेच असते. त्यामुळे प्रत्येक गावाला प्लास्टीक कच-याची मोठी समस्या भेडसावत असते. हा कचरा पर्यावऱणाला हानीकारक असल्याने त्याचे दुरगामी परिणाम आहेतच. 
         
वारीच्या वाटेकर वारयंदा वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेकांनी स्टीलचे ग्लास वापरले. तर चहासाठी कागदी ग्लासचा वापर मोठया प्रमाणात झाला. वारकऱ्यांना जेवणासाठी अनेक दिंड्यांनी थर्माकोलच्या पत्रावळीपेक्षा स्टीलची ताटे व ग्लास आणण्याचे सुचना वारकऱ्यांना आधीच दिल्या होत्या. या बदलामुळे पारंपरीक व कागदी पत्रावळी रस्त्याच्या कडेला दिसत होत्या. पाण्याच्या बाटल्या पाणी पिल्यानंतर फेकल्या जातात. या बाटल्याही यंदा नेहमीपेक्षा कमी दिसल्या. एकूणच प्लास्टीकचा वापर मोठया प्रमाणात कमी झाल्याने वारी निर्मल दिसत आहे. हा बदल अन्य गावात टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the Sant Tukaram Maharaj Palkhi plastic waste has declined by seventy percent