नव्या नोटांसोबत सेल्फी अन्‌ स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - बॅंकांकडून नवीन 2 हजार रुपयांच्या नोटा हाती पडताच त्यासोबत सेल्फी काढून ते छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. सोबत देशभक्तिपर चिन्हांसह नवीन नोट खराब न करण्याची विनंती करणारे संदेश पाठवून एक चांगली सुरवात करण्याचे आवाहनही केले जात आहे. 

नवीन चलनावर काहीही लिहू नका, एक चांगली सुरवात करा आणि सहकारी, मित्र, कुटुंबातील सदस्यांनादेखील ही माहिती द्या, अशी विनंती व्हॉट्‌सऍप, फेसबूक आदी माध्यमांवर करण्यात येत होती. 

विशाल मुंदडा या तरुणाने हजार रुपयांच्या नोटा बदलून गणेशखिंड रस्त्यावरील बॅंकेतून 2 हजार रुपयांची नोट मिळविली. तो म्हणाला, ""या 2 हजार रुपयांच्या नवीन नोटेबाबत उत्सुकता होती. त्यामुळे त्यासोबत सेल्फी काढून तो मित्रांच्या व्हॉट्‌सऍप आणि फेसबूकवर अपलोड केला. सोशल मीडियावर विनोदी संदेश मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्याचबरोबर नोट खराब न करण्याचा सामाजिक संदेशदेखील पाठविण्यात येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.'' 

दिनेश वाटेगावकर यांनीही नोटेवर काहीही लिहू नका, तसे केल्यास नोटांच्या देखभालीचा खर्च वाचेल, असे आवाहन केले. 

नवीन नोटांवर लिहिलेले असल्यास त्या स्वीकारण्यात येऊ नये, अशा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सूचना अगोदरपासूनच आहेत. नोटांवर शाईने काही लिहिल्यास त्या बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्या खराब करू नयेत. चलन हे राष्ट्रीय संपत्ती असून ती हाताळण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे त्याच्या मूळ रूपात बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही. 
- सुषा कोष्टी, उप-व्यवस्थापक, महाराष्ट्र ट्रस्टी कंपनी