हुतात्मा जवानांचे स्मारक उभारणार: बाबूराव पाचर्णे

नागनाथ शिंगाडे
शनिवार, 21 एप्रिल 2018

तळेगाव ढमढेरे (पुणे): निमगाव म्हाळुंगी ही आजी-माजी सैनिकांची पवित्र भूमी आहे. देशासाठी हुतात्मा जवानांची प्रेरणा आधुनिक पिढीला स्फूर्तीदायी ठरण्यासाठी आगामी एका वर्षात शासनाच्या मदतीने सर्वसुवीधानियुक्त स्मारक उभारणार असून, माजी सैनिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिले. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे 'जय जवान माजी सैनिक संस्थे'च्या चौदाव्य वर्धापन दिनानिमित्त आज (शनिवार) आयोजित केलेल्या माजी सैनिक मेळाव्यात आमदार पाचर्णे बोलत होते.

यावेळी आमदार पाचर्णे म्हणाले की, शिरूर तालुक्यात आजी-माजी सैनिकांची संख्या मोठी असून निमगाव म्हाळुंगी येथे हुतात्मा जवानांची प्रेरणा नागरिकांमध्ये अखंडीत राहावी म्हणून भव्य स्मारक उभारणार आहे. यामध्ये वाचनालय, बाग, बैठक व्यवस्था आदी सुविधा करणार आहे. माजी सैनिकांसाठी शासनाच्या उज्वल योजनेंतर्गत घरपोच, मोफत व विनाअट गॅसचे कनेक्शन देण्याची तरतूद करणार आहे. शिरूर तालुक्यातील विर जवानांचा सर्व्हे करून त्यांची यादी तयार करण्याचे काम चालू असून, त्यामाध्यमातून जवानांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना 8 लाखावरून जानेवारी 2017 पासून 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद शासनाने केल्याचे श्री. पाचर्णे यांनी सांगितले. निमगाव म्हाळुंगीला मुख्य रस्त्यापासून जोडणारया सर्व रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील, तसेच तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत निमगाव आघाडीवर असून येथील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन विज उपकेंद्राचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल संस्था चालकांचे विशेष कौतुक आमदार पाचर्णे यांनी यावेळी केले.

राज्य सैनिक कल्याण विभागाचे कर्नल सुहास जतकर म्हणाले की, येथील माजी सैनिकांना औषधोपचारासाठी महिन्यातून एकदा मोफत व्हॅन पाठविली जाईल. वानवडी येथील हॉस्पीटलमध्ये उपचार करून पुन्हा त्याच व्हॅनमध्ये घरी सोडविण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, माजी सैनिकांच्या पेन्शनचा प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी हेमंत महाजन यांचे भाषण झाले.
मेळाव्याला पंचायत समितीचे सदस्य विजय रणसिंग, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, सरपंच चांगुणा काळे, पोलिस पाटील किरण काळे, संस्थेचे सचिव चंद्रकांत चव्हाण, कार्याध्यक्ष रामचंद्र विधाटे, सहसचिव लक्ष्मण शिवले, उपाध्यक्ष दादाभाऊ थोरात, खजिनदार दिनकर बाठे, लक्ष्मण कुसाळे, मारूती चौधऱी, भगवान पवार, माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. जय जवान माजी
सैनिक संस्थेचे अध्यक्ष शंकरराव लांडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवा नेते विक्रम चव्हाण यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Web Title: set up a memorial for martyrs in nimgaon mhalungi