पिंपरीत दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार

संदीप घिसे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

शाळेमध्ये मुलींना शिक्षकांनी गुड टच आणि बॅडटच याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी आपल्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पिंपरी - पिंपरीगाव येथे पाच आणि सहा वर्षीय दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय महिलेने याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीगाव येथे 3 जानेवारी ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये 14 आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलांनी फिर्यादी यांच्या पाच आणि सहा वर्षीय बालिकांवर लैंगिक अत्याचार केले. शाळेमध्ये मुलींना शिक्षकांनी गुड टच आणि बॅडटच याबाबत माहिती दिली. त्यानंतर या मुलींनी आपल्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षकांनी ही बाब तिच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलिस उपनिरीक्षक रत्ना सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sexual Harassment On Two Girls In Pimpri Pune