पीएमपी कर्मचाऱ्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - पीएमपीचे कर्मचारी टक्केवारी आकारून नोटा बदलून देत असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पीएमपीच्या मुख्य इमारतीच्या आवारात सोमवारी सकाळी आंदोलन केले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी सहव्यवस्थापकीय संचालक दगा मोरे यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर संघटक सचिन तावरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या वेळी शिवसेनेचे निवेदन स्वीकारण्यासाठी मोरे त्यांच्या कार्यालयातून इमारतीच्या आवारात आल्यावर काही कार्यकर्त्यांनी मोरे यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी चिल्लरही उधळली. त्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. 'शिवसेनेने केलेल्या आरोपाबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा अहवाल सात दिवसांत मिळेल,'' असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

कामगारांवरील आरोपांचा निषेध
दरम्यान, "पीएमपीचे कामगार, अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. तसेच मोरे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसोबत आंदोलकांनी केलेले वर्तन निषेधार्ह आहे,' असे पीएमटी कामगार संघाचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र खराडे आणि सचिव नुरुद्दीन इनामदार यांनी म्हटले आहे.

टॅग्स

पुणे

पुणे : "बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानवाद पोचू शकत नाही. परंपारांच्या आधीन गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या लखलखीत वैज्ञानिक...

01.48 PM

पुणे : "ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत 'गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण' असल्याचे म्हणत असतील, अशा देशात...

01.12 PM

पुणे : "अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र...

11.39 AM