शिवसेनेत राजीनामासत्र सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - उमेदवारी वाटपावरून शिवसेनेत निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. निष्ठावंतांना डावलल्याच्या कारणावरून खडकवासला मतदारसंघातील युवा सेनेच्या विभागप्रमुखांसह अनेकांनी पदांचे राजीनामे दिल्याने यात आणखी भर पडली आहे. 

पुणे - उमेदवारी वाटपावरून शिवसेनेत निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. निष्ठावंतांना डावलल्याच्या कारणावरून खडकवासला मतदारसंघातील युवा सेनेच्या विभागप्रमुखांसह अनेकांनी पदांचे राजीनामे दिल्याने यात आणखी भर पडली आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी ऐनवेळी पक्षात आलेल्यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले, त्यातून शिवसेनेत गोंधळ उडाला होता. त्याचे पडसाद शहरातही उमटले होते. या संदर्भात पक्षाचे सचिव आणि खासदार नितीन राऊत यांनी अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत फारशी नाराजी नसल्याची कबुली दिली होती. मात्र, गुरुवारी प्रभाग 38, 39 आणि 40 मधील युवा सेनेचे विभागप्रमुख संग्राम जगताप यांच्यासह 34 जणांनी थेट पदाचे राजीनामे दिले आहेत. ही नाराजी एवढ्यावरच थांबली नाही, तर पक्षातील जुने आणि ज्येष्ठ नेते प्रचारात उतरल्याचे दिसत नाही. त्यामुळे नाराजी कायम असल्याचे बोलले जात असून, ही नाराजी दूर करण्यात पक्षनेतृत्वाला अपयश आल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 

उद्धव ठाकरे यांची बुधवारी सभा 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी (ता. 15) पुण्यात जाहीर सभा होणार आहे. ही सभा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यासह शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, शरद पोंक्षे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी नेत्यांच्या तोफा धडधडणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा "रोड शो'देखील आयोजित केला आहे. 

Web Title: Shiv Sena continues to resign