पारदर्शी कारभारासाठी उपलोकायुक्त नेमण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभारही पारदर्शी व्हावा, यासाठी या दोन्ही शहरात स्वतंत्र उपलोकायुक्त आणि माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शकपणे होण्यासाठी उपलोकायुक्त आणि तीन माजी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे. 

डॉ. कोल्हे म्हणाले,""पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. महापालिका निवडणुकीत पारदर्शक कारभारासाठी आम्ही लढत असल्याचे यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात ज्या महापालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्या सर्वच ठिकाणी पारदर्शक कारभार झाला पाहिजे. पारदर्शक कारभारासाठी शिवसेनाही कटिबद्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी उपलोकायुक्त आणि माजी सनदी अधिकाऱ्याची समिती नेमावी. जेणेकरून महापालिकेच्या विशेष समित्यांमध्ये मंजूर होणाऱ्या प्रत्येक प्रस्तावावर देखरेख ठेवून विकासकामे गतीने मार्गी लागण्यास मदत होईल.'' 

पारदर्शी कारभार हा सर्वत्रच असला पाहिजे. मुंबईपुरता असून तो उपयोगाचा नाही. त्यामुळेच आम्ही ही मागणी केली आहे. पारदर्शी कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आमची ही मागणी ते नक्कीच मान्य करतील, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.