शिवसेना स्वबळावर लढणार - निम्हण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पुणे - 'पुणे महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढविणार असून, या संदर्भात भाजपशी चर्चा करण्याचे काहीच कारण नाही,''

असे पक्षाचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले. जागा वाटपाबाबत पक्षाबरोबरच चर्चा सुरू असल्याचे सांगून पुणेकर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कुटिल डाव भाजपकडून खेळला जात आहे, अशी टीकाही निम्हण यांनी केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निम्हण यांनी पत्रक काढून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. युतीबाबत भाजपकडून हेतूपुरःसर अशा बातम्या पेरल्या जात आहेत, अशी टीकाही यात केली आहे. यावरून भाजप-सेना युतीतील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे खासदार आणि आठ आमदार निवडून आले. त्यामागे कॉंग्रेस राजवटीबद्दलची चीड आणि मोदी लाट हे कारण होते. ही लाट आता पूर्ण ओसरली असून ती पक्षाला आलेली सूज होती. ही वाढ नसल्याची जाणीव आता भाजपच्या नेत्यांना झाली आहे. केंद्र आणि राज्यातील भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावरून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात भय निर्माण झाले असून त्यातून शिवसेनेशी युती होणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. शकुनी मामाच्या कपटी डावाप्रमाणे भाजपकडून कपटी डाव खेळले जात आहेत. शिवसेना स्वबळावर लढणार असून भाजपने युती होण्याच्या वावड्या उठविणे बंद करावे, असेही पत्रकात म्हटले आहे.

पुणे

पिंपरी - संरक्षण विभागाने देशभरातील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ‘खडकी, पिंपरी...

12.24 AM

पुणे - बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे 43 हजार रुपये काढल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आणखी एका नायजेरियन नागरिकाला...

12.09 AM

सासवड - पुरंदर तालुक्याचे पाऊसमान घटल्याने गेली कित्येक दिवस पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे टँकर मागावे लागत आहेत. तर ते न...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017